Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mayuri Kadam

Inspirational

3.5  

Mayuri Kadam

Inspirational

कवितेचं शीर्षक : पर्यावरण व

कवितेचं शीर्षक : पर्यावरण व

1 min
722


कवितेचं शीर्षक: 

         पर्यावरण वाचवा.


एक चिमणी सिमेंट काॅक्रिंटच्या जंगलात हरवली अन्अन्न,पाणी,आॅक्सिजन,हिरवळ मिळेना म्हणून गुणगुणली.

 

पर्यावरण वाचवा प्राण वाचवा,

नको तुझ्या मुखी हे शब्द मानवा.


जंगलतोड मासेमारी नको करु प्राण्यांची शिकार,

नाही तर तुझे भविष्य शंभर टक्के भिकार.


ट्रॅक्टरयुग रासायनिक खतांमुळे बिघडून जाणारा जमिनीचा पोत,

वृक्षतोडीमुळे उरणार नाही एकही पाण्याचा स्रोत.


आमच्या चोचीतनं बी पडून उगवतात झाडे,

हातपाय असूनही मानवा तुझे विचार मात्र नागडे.


संत तुका देई उपदेश वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,

तू तर घालतोस रोजच वृक्षांवर चरे.


शिवरायीन काली वृक्ष तोडणे हा दखलपात्र गुन्हा ,

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तुला फुटेना कसा पान्हा?


अहिल्या, रामदास,सम्राट अशोक यांचा इतिहास सांगी वनप्रेम,

जगदिशचंद्र बोस सिद्ध करी वनस्पती संवेदना सप्रयोग सप्रेम.


अंगणी, पटांगणी भाज्या लावा,

पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिम राबवा.


सौरचुली,सौरगाड्या , सौर कुकर चालवा,

कुटुंबाची संख्या मर्यादित ठेवा.


खेडेदत्तक घेवूनी 'देशऋणमुक्तीपर' कार्यक्रम भरवा,

पर्यावरण मित्र बना,भविष्य घडवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational