Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajesh Sabale

Others

3  

Rajesh Sabale

Others

हरवलेले बालपण

हरवलेले बालपण

1 min
465


मला पाहिजे होते सारे, जीवन पहिल्या नात्याचे।

हरवलेल्या बालपणीचे, माय पित्याच्या प्रीतीचे।।धृ।।


जात्यावरती दळण दळता, आई गातसे अंगाई।

पाळण्यात मी झोके घेईता, मध्येच देई जांभई।।

चांदण्यात रातीत मजला, गोष्ट सांगते मामाची।

लिंबोणीच्या झाड मागे, चंद्र झोपला असल्याची।।

आता न माझे कौतुक होते, बालपणीच्या खोडीचे।

हरवलेल्या बालपणीचे, माय पित्याच्या प्रीतीचे।।१।।


बोल बोबडे वाईट जितुके, किती बोललो गंमतीने।

कवटाळून मज छाताडाशी, प्रेम दाविती हिमतीने।।

आले दिवस गेले किती, कळले नाही जाताना।

अंगणामध्ये रांगत होतो, हसता रडता गाताना।।

हसणे रडणे हसे जाहले, गीत माझिया जन्माचे।

हरवलेल्या बालपणीचे, माय पित्याच्या प्रीतीचे।।२।।


काय गुन्हा मी केला होता, अपराध माझा कळेचना।

फळे भोगतो कुण्या कर्माचे, माझे मला समजेच ना।।

बालपणीचा अल्लड मी, माय-पित्याचा कान्हा होतो।

खोड्या करीतसे मीच परंतु, ममते पुरता तान्हा होतो।। 

कधी सरले ते कळले नाही, बालपणीचे दिवस सुगीचे।

हरवलेल्या बालपणीचे, माय पित्याच्या प्रीतीचे।।३।।


Rate this content
Log in