नाते जन्मोजन्मीचे.
नाते जन्मोजन्मीचे.
दुख तुझे तर अश्रु माझे
हसू तुझे तर ओठ माझे
साथ कधी ही सोडून नको जाऊस तू
अडखळल्यावर मात्र मला सावर तू
नाते असे तुझे माझे आहे जन्मोजन्मीचे
कधीही न तुटनारे नाते आपले मैत्रीचे
तू ऊन मी सावली
तू चंद्र तर मी चांदणी
तुझ्या शिवाय अस्तित्व अपुरे आहे माझे
तुझ्या मैत्रीचा प्रकाश माझ्या अंगणी
नाते असे तुझे माझे आहे जन्मोजन्मीचे
कधीही न तुटनारे नाते आपले मैत्रीचे
अधुर्या शब्दाना माझ्या तू अर्थ दिलेस
देवून तुझी साथ जगणे माझे सार्थ केले
आभार तुझे मानण्यासाठी
शब्द मझे खुजे आहेत
बोलत मी असले तरी
स्वर मात्र तुझे आहेत
नाते असे तुझे माझे आहे जन्मोजन्मीचे
कधीही न तुटनारे नाते आपले मैत्रीचे