विठू माऊली
विठू माऊली
1 min
1.5K
चंद्रभागेतिरी उभा
पंढरीचा विठुराया
भक्तांसाठी धाव घेत
विठू शिणवितो काया।
पुंडलिक भेटीसाठी
विटेवरी पाहे वाट
रूप सावळे विठूचे
काय वर्णू त्याचा थाट।
विठू भक्तांची माऊली
भक्ता दुःखातून तारी
टाळ मृदुंगाचा घोष
मनोभावे करा वारी।
विठू ज्याचा प्राणसखा
त्याच्या जीवा नाही घोर
सुख दुःखा निवारितो
कीर्ती त्याची जगी थोर।
रखुमाई अर्धांगिनी
विठूराया ती साजते
स्वागतास पंढरीत
सोबतीने ती राबते।
पांडुरंग,पांडुरंग
मुखी नाम जो जपतो
त्याच्या कष्टालाही
पांडुरंग साथ देतो।