Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shital Yadav

Others

3  

Shital Yadav

Others

हरवलेले शब्द

हरवलेले शब्द

1 min
7.1K


शोधते माझे हरवलेले शब्द

जीवनाच्या या वळणांवर अशी

लावून धार लेखणीस ज्ञानाची

भावनांचे पैलू उलगडते जशी


चातकापरी लागली तृष्णा जणू

वाट बघते शब्दांच्या पावसाची

चिंब भिजवी प्रेमसरी शब्दांच्या

सुगंधित होती नाती माणसाची


शब्दरुपांतून साकार होती स्वप्ने

त्यातूनच आकार घेई भविष्य

लाभणार माझे हरवलेले शब्द

तेव्हाच गवसणार खरे आयुष्य


Rate this content
Log in