Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

वंजारी समाज गीत(भटका समाज)

वंजारी समाज गीत(भटका समाज)

1 min
14K


आम्ही वंजारी, वंजारी

आम्ही भटके रे वंजारी

आम्ही भारताचे वंजारी

आम्ही महाराष्ट्राचे वंजारी


ऊस तोडी आणि मजूरी

होतो गावोगावी स्थलांतरी

समस्या संपल्या नाही खरोखरी

गरीब आम्ही रे वंजारी


खंडोबा दैवत भारी

गर्दी जेजुरी गड़ावरी

वारकरी आणि मंडळी

करतो प्रबोधन घरोघरी


पोटासाठी आमुची भटकंती

आम्ही राबतो शेतावरी

छोटी, मोठी रे नोकरी

पोटासाठी शहरो शहरी

आम्ही वंजारी, वंजारी

आम्ही भटके रे वंजारी


स्वाभिमानी आणि कणखर

कष्टाला नाही भिनार

नाही कुन्हापुढे झुकनार

भाकरी फुकाची नाही खाणार


आता शिकली सवरली रे पोरे

व्यवसायात हुशार फार

त्यांची भटकंती देश विदेश भर

आम्ही वंजारी, वंजारी

आम्ही भटके रे वंजारी


संयम, नम्रता, ईमानदार

सर्व खेत्रात आघाडीवर

आहे गुणी जनांचे भांडार

शिक्षणाची कमाल फार

शिक्षितांचे स्वप्न साकार

आम्ही वंजारी, वंजारी

आम्ही भटके रे वंजारी


शूर, काटक वंजारी

महाजिद्दी रे वंजारी

विश्वासू रे वंजारी

श्रद्धाळु प्रत्येक वंजारी

कवी संजय गातो गीत

माझ्या वंजारी समाजास

आम्ही वंजारी, वंजारी

आम्ही भटके रे वंजारी.


Rate this content
Log in