प्रीतीची धाव
प्रीतीची धाव
अशी धाव गं सखे धाव ..
तुझ्या प्रेमाच्या देवळात थोडं मला पाव
अशी धाव गं सखे धाव ...
तुला कळला ना प्रीतीच्या जीवाचा हा भाव
तुझ्या नजरेनं घातलेला खोलवर घाव
माझ्या दिलाच्या ठोक्याला सारं काही ठाव
अशी धाव गं सखे धाव...
तुझ्या डोळ्याच्या काजळ।नं नजर मला लाव
माझ्या काळजात टिपलेलं वाच तुझं नाव
तुझ्या मुरक्याचा,हिसक्याचा सोड ना गं आव
अशी धाव गं सखे धाव...
तुझ्या गालावरल्या गुलाबीनं पेटलाय गाव
माझ्या मनामधी जळतंय वेंधळं हे भ्याव
तुझ्या इशकाच्या बागेमधी रोपटं हे लाव
अशी धाव गं सखे धाव...
माझ्या गहिऱ्या गहिऱ्या स्वप्नामधी वाट तुझी दाव
मी फेकलेल्या फाश्याचा पडू दे ना डाव
तू नेस ना गं माझ्या मिठीचा पेहराव
अशी धाव गं सखे धाव
तुझ्या प्रेमाच्या देवळात थोडं मला पाव..