गेय ओवी
गेय ओवी
1 min
20.7K
(१ ) डोईवर पदर दिसे शोभून
नारी नको लेऊ अर्धी इजार
थोरामोठ्यांचा कर आदर
विसरू नको पिढीचा संस्कार
(२) नारी हसू नको ग
तू अशी चारचौघात
पाप येईल जनाच्या
नजरेत
(३) अस ग कसं हे कलीयुग
लाजलज्जा सोडली वा-यावरी
सोशलमिडीयावर रातदिन
नरनारी नाही ताळ्यावरी
(४) कपाळीचं कुंकू बाई
सवाष्णीच ग लेणं
धन्याशी राखं इमान
टिकलीला नाही मेणं
(५) थोर आपुली संस्कृती
तिचा जगी मोठा ,मानपान
ठेवा ध्यान ग सख्यानो
होणार नाही खाली मान