तहान
तहान
1 min
439
तहान असते विविध प्रकारची
तान्ह्याला आईच्या कुशीची
भक्तांना परमेश्वराच्या छायेची
चातकाला पावसाच्या पाण्याची
तहान कधी भागत नाही
काही केल्या मन भरत नाही
लावूनी वेडी ही आशा
भटकतो दाही दिशा