Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

4  

Abasaheb Mhaske

Others

बोलाचाच भात नी बोलाचीच कढी...

बोलाचाच भात नी बोलाचीच कढी...

1 min
15K


बोलाचाच भात नी बोलाचीच कढी

खोटं- खोटं का होईना पोटभरलं म्हणा

नुसतं म्हणायला काय जात तुमच ?

लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही


भ्रष्टाचार , हुंडाबळी , अराजक मजल चोहीकडे

बेरोजगारीवाढलीय , महागाई आकाशाला भिडलीय

जगाचा पोशिंदा शेतकरी देशोधडीला लागला

नेते संधीसाधू , मुजोर झालेत नोकरशहा

मान्य आहे हो आम्हाला तुम्ही संत नाही ...

पण तुम्हाला कशाचीच कशी खंत नाही ?

केवळ घोषणांच पीक , अशवसनाचा पाऊस

प्रत्यक्षात कर्तव्य मात्र ऐशी की तैशी ...

थापाड्याच्या शेतात जणू बारा औत..

बघायला गेलं तर एकही नव्हतं ...

आश्वासनच वांझोट पीक कुठवर काढताय ?

विरोधकांचं नावं का उगाच खडे फोडताय ?


समजू नका तुम्ही जनता इतकी भोळी

योग्य वेळ आपवार जनता जागा दाखवून देतेच

त्यांना चांगलंच माहित असत ,

कसं आवराव कोणतं जनावर ?




Rate this content
Log in