Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti gosavi

Others

5.0  

Jyoti gosavi

Others

बलिदान तुझे नाही फुका

बलिदान तुझे नाही फुका

1 min
509


पाहून या इतक्या शवपेटीका

चुकला आमच्या काळजाचा ठोका

हे चिरनिद्रा घेणाऱ्या सैनिका

बलिदान तुझे नाही फुका


नाही काढणार आम्ही कॅन्डल मार्च

नाही करणार मुक रुदन

तुझा बदला घेणे

हेच रे होईल तुला अभिवादन


आमच्या येथे पुलवामा झाले

झाले येथेच उरी

तोच घाव खोल खोल

बसला रे आमच्या ऊरी


उरात पेटलेली आग आता

डोळ्यात संतापाचे पाणी

नाही गाणार फुकाच

तुझ्या शौर्याची रे कहाणी


मग आम्ही देखील केला

बालाकोट

अभिमानाने उर भरला

भरले आनंदाने पोट


तुझ्या दहाव्याच्या दिवशी

दिधली तुझं मानवंदना

लक्ष लक्ष नमस्कार माझे

अशा या पुरुषोत्तमा


Rate this content
Log in