Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

गोविंद ठोंबरे

Fantasy Others

2  

गोविंद ठोंबरे

Fantasy Others

देवा मला

देवा मला

1 min
7K


देवा मला आभाळातलं थेंब-पाणी बनू दे ।

मातीतल्या बीजांनी पोटभर पिऊ दे ।।

पहाटेच्या पातीवर दव मोत्यांनी चमकू दे ।

थेंबे थेंबे पाण्यानं तळं सारं भरू दे ।।


देवा मला पंख पाखराचं झेपावणारं रूप दे ।

थव्या थव्यानं भिरभिरणारं एकीचं बळ दे ।।

आकाशाला गवसणी घालणारं जिद्दीचं हुरूप दे ।

खोप्यामध्ये चिवचिवणारं सुंदर सुखी घर दे ।।


देवा मला किड्या-मुंगीसवे लहानगं होऊ दे ।

इवल्याश्या देहानं डोंगरकडे चढू दे ।।

साखरगोडीच्या दाण्यापाई कष्ट सारं झिजू दे ।

बेभान सुटलेल्या वाऱ्यातही मातीमध्ये निजू दे ।।


देवा मला तुझ्या ठायी माणूस होऊन जगू दे ।

माणुसकीच्या शिदोरीतला भाकर तुकडा खाऊ दे ।।

स्नेहभावाच्या झऱ्यामध्ये स्वच्छन्द रोज न्हाऊ दे ।

सुखी संसाराच्या भिंतीमध्ये गोड गाणं गाऊ दे ।।



Rate this content
Log in