*वाचन*
*वाचन*
1 min
6.9K
पुस्तकांच्या जगात
लपलाय ज्ञानसागर
ग्रंथसंपत्तीन संपादन
होते अमृताची घागर.....
वाचनाने समजते
शब्दांशब्दांतील भाव
सर्व कसे अर्थपूर्ण
मनामनाची धाव...
पूर्वी जे घडून गेले
त्याने इतिहास घडवला
ते सर्व अमर झाले
पुढील पिढीला इतिहास समजला....
आज ज्ञानगंगा वाहतेय
विविध पुस्तकातूनी,इ.साहित्यातूनी
ज्ञानी लेखक लेखिकांचे
कौतुक करू आपण वाचन करूनी....
डाॅ.अब्दूल कलाम यांचा
जन्मदिन सुमूहुर्त साधूनी
साजरा करू "वाचन प्रेरणा दिन'
बाल गोपालांना संगती घेउनी....
जीवनातील अनुभव
लिहून ठेवू कवितेतूनी
सदोदित आपण व्यक्त होऊ
शब्दांच्या गाभार्यातूनी.....