Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajesh Sabale

Abstract Others

2  

Rajesh Sabale

Abstract Others

||हिरवा शालू||

||हिरवा शालू||

1 min
2.3K


दिवसाढवळ्या भर उन्हात, मन माझं जळत होतं।

अन तुझ्या एका स्पर्शासाठी, मन माझं झुरत होतं।।

 

पडेल पाऊस आता तरी, मनात नुसतं भासत होतं।

अन तुला भेटण्यासाठी, मन चिंब भिजून येणार होतं।।

वाटलं होतं पावसात मला, बिलगून तुला बसायचं होतं।

अन अंधारलेल्या नभात, विजेसारखं चमकायच होतं।।

 

पण ढगांचा गडगडाट अन, विजांचा कडकडाट झाला नाही।

अन तुझ्या मनातलं खरं प्रेम, मला कधी कळलंच नाही।।

धरणीमाता आणि पावसाचं प्रेम, पूर्वीपासून असंच होतं।

अन इंद्रधनूच्या कमानी खालून, हिरव्या शालूत दिसत होतं।।

 


Rate this content
Log in