Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

मुखवटा

मुखवटा

1 min
561


मानवी जीवनाच्या रंगमंचावर

रोजच चढवावा लागे मुखवटा

कधी असे उत्सव आनंदाचा

कधी पाळावा लागे दुखवटा


स्वार्थ साधण्यासाठी असते

खोटीच आपूलकी मुखकमली

हेतू प्राप्तीसाठी करावी लागे

कोणाची प्रसंगी खोटी हमाली


व्यक्ती तितक्या प्रकृती जगी

कुणी चढवी मुखवटा कसा

मनात त्याच्या भाव जो असे

बोलतो त्याचा मुखडाच तसा


सोपे असले फसविणे जगास

मुखवट्यामागे लपवून मुख

स्वार्थी जनाला काय कळावे

दुःखितांचे काय असे दुःख


हास्य फुलविण्या दुःखितांचे

संग्रही ठेवावा असाही मुखवटा

चेहऱ्यामागचे दुःखही लपवून

पळवून लावू दीनांचा दुखवटा


जीवनाचा रंगमंच सजवावा

मुखवट्यांआड जपून संवेदना

वाटत रहावे हास्य आणि सुख

मगच अर्थ येईल या जीवना!!!


Rate this content
Log in