Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

चल कविते ! आपण लुका छिपी खेळू.

चल कविते ! आपण लुका छिपी खेळू.

1 min
13.3K


चल कविते ! आपण लुका छिपी खेळू..तो कोठेही लप मी शोधीनच तुला ....

तू मला अजिबात सापडू नकोस ,तू कोठेही लप तुला आवडेल तिथे .

तू जिथं लपशील, मी शोधीनच तुला, कारण तुझं प्रत्येक स्थळ मला माहितेय  

तू लपून लपून लपणार कुठे? झाडा - झुडपात पानं - फुलात , दगड गोट्यात

हंबरणाऱ्या गाईच्या गोठयात... आणि हरवलेल्या गाण्यात ...

माणुसकी हरवलेल्या  सिमेंटच्या जंगलात , गावाच्या वेशीत 

मोडक्या झोपडीत , फाटक्या झोळीत नि फुटक्या थाळीत 

 भकास झालेल्या गावात नि फासी गेलेल्या कुणब्याच्या घरात ..

निसर्गाने ,आणि व्यापाऱ्याने ओरबाडलेल्या कुणब्याच्या डोळ्यात... 

कामगार ,शेतमजुरांच्या फाटक्या संसारात ,आटलेल्या ओढ्या - नाल्यात 

कविते! तू सापडशीलाच सरकार दरबारी कुजणाऱ्या फायलीत , दंगलीत ...

माणूसपण हिरावून घेणाऱ्या सर्व कारणीभूत ठगांचा समाचार घेणाऱ्या मना - मनात ..

कविते ! तू जिथे जिथे जाशील तिथे- तिथे मी येणारच कारण.. 

तू माझी सावली आहेस ... सावली कधी वेगळी होऊच शकत नाही 

तुझं नि माझं दुःख वेगळं असं अस्तित्व असूच शकत नाही ...

कविते ! माझा श्वास आहेस , शेवटचं क्षणापर्यंत मला तुझी साथ हवीय ...


Rate this content
Log in