Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
भेट तुझी माझी
भेट तुझी माझी
★★★★★

© Latika Choudhary

Romance Abstract

1 Minutes   1.3K    5


Content Ranking

 मृत्यूला या कवटाळून गेली भेट तुझी माझी

 जगण्याला या भाळून गेली भेट तुझी माझी

 

 बाग बहरे जीवनाची उमलली प्रितफुले

 हृदयावरती माळून गेली भेट तुझी माझी

शमती वादळ उठुनी तरंग उठती मनी

भाव मनीचे चाळून गेली भेट तुझी माझी

 

 अर्थ दिधला जन्माला श्वास तूच माझा

 हे आनंदाश्रू ढाळून गेली भेट तुझी माझी

 

 साथ सोडली रक्ताने अन परके झाले सारे

 वाट वैऱ्याची टाळून गेली भेट तुझी माझी

बघ अबोल आसवे कशी दाटती नयनी

सल बोचरी गाळून गेली भेट तुझी माझी

 

 मनी लपवला सूर्य हाती घेऊन चंद्रमा

 द्वेष असूया जाळून गेली भेट तुझी माझी

 नको नको त्या शंका सदा उठवती अफवा

 व्रत मौनाचे पाळून गेली भेट तुझी माझी

प्रेम भेट प्रीती

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..