Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nagesh Dhadve

Others

2  

Nagesh Dhadve

Others

आता थकलोया मी

आता थकलोया मी

1 min
1.4K


तापत्या उन्हात
जीवाचं घाम,
चालत्या जगात 
नाही आम्हास दाम,
श्वास थांबून
डोळे बंद करून
जगतोया मी
आता थकलोया मी

मिळे दिसातुनी मला
पोटाचा तुकडा,
आयुष्य फाटले जरी
नाही मिळे लुगडा,
दुःख असूनही
मला अश्रू नाही
सुखाच्या शोधात
आता थकलोया मी

जमीन असून
पाणी नाही,
पाण्याबिना कोणा
काम नाही,
जळत्या राखेत
नापीक मातीत
आयुष्य जळून
आता थकलोया मी

आता शेवट करावा
या वाळवंटाचा
ढग गर्जले तरी
नाही फुटायची वाचा
या अर्थ नसलेल्या
जीवनाला
खरंच , थकलोया मी !!

 


Rate this content
Log in