Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

सांगता येत नाही

सांगता येत नाही

1 min
13.2K


तुला ते सारे आज आठवते का ते माहित नाही

ठरवले कितीदा मला ते विसरता येत नाही ||

कधी आठवेल काय आठवेल काही नेम नाही 

आठवणी सार्या तुझ्या दुसर्या कुणाच्या येत नाही ||

मेंदीभरल्या हातावरचे तू नाव माझे दाखवले 

खोटे होते दाखले हे आजही म्हणता येत नाही || 

घुटमळते हे मन आकाशी सरत्या संध्याकाळी 

भिरभिरते उदासवाणे ते खाली काही येत नाही ||

दिवाना आहे तुझा मी हे गुपित नाहीच राहिले 

मनात आहे तुझ्या का तुज सांगता येत नाही ? ||

कुत्सितपणे हसती लोक हे दगड-काळजाचे

हिणवतात मज किती कसे सांगता येत नाही ||

करू मुकाबला निष्टुर दुनियेचा मिळूनी दोघे 

कसे असती दिवस उद्याचे ? सांगता येत नाही ||

 

 

 


Rate this content
Log in