Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

कन्यारत्न

कन्यारत्न

1 min
677


माझी लाडाची तान्हुली

आज जन्मास आली

लई दिवसांची इच्छा पूर्ण हो केली

दीप वंशाचा ती आज झाली

साऱ्या घरात आनंद घेऊन आली

आज खरी घराची शोभा तिने वाढविली


तिच्या पायातच धन तेजस्वी पावली

नाही कुणाची ती भार याची चाहुल लागली

जीव साऱ्यांचा ती क्षणातच झाली

करा रे जन्म सोहळा सर्व नात्यांची लाडली

नको तिची अडचण, श्वास सर्वांची झाली

इच्छा तुमच्यासाठी ती घेऊन आली


करा ,करा हो स्वीकार, दारी श्रीमंती आली

साऱ्या सुखाची माऊली धन्य, धन्य ती झाली

करा संगोपन हृदयातून ती सर्वांची सावली

साता जन्माची हो नाती तिनेच जोडली

सर्व समाधानाचे आगर, तिच्या मायेत दिसली

द्या रे, द्यारे शिक्षण, आशेची गुरुकिल्ली


साऱ्या इच्छा पूर्ण करा, आदर्श महिला आपली

सर्व सुखात जगवा, उणीव नको आपल्या भाळी

तेच खरे तिचे जीवन,सर्व जनांची लाडली

येईल मागणी आप्तांची, काळजी जीवाला लागली

माया तुमच्यावर निस्वार्थ तिची कायम राहिली

कन्यादानात तुमच्या, ती अश्रुनी नाहली

बाप, बाप म्हणुनी फिरून मागे पाही लाडली

बापाच्या अश्रुत ती दैदीप्यमान भासली.


Rate this content
Log in