गुलाबी गुलाबी थंडी
गुलाबी गुलाबी थंडी
1 min
314
गुलाबी गुलाबी थंडी
घाला अंगात बंडी
पेटवा आता शेकोटी
रंगू दे छान हुरडा पार्टी
नको सकाळी उठायला
दांडी मारु आता शाळेला
आई बाबा हो म्हणताच
घेऊनी रजई गेलो झोपी
प्रश्न माझा वेगळा
कशाला हवी शाळा नी अभ्यास
शक्कल लढवून घेऊ
चार महिने सुट्टी
गुलाबी गुलाबी थंडी
कानाला बांधा पट्टी
पोटात दुखत ताप येतो
रोज रोज करू नाटक