भ्रूणहत्या
भ्रूणहत्या
आई तुझेच रूप मी
फसू नको ना चक्रात ?
मीच ते प्रेम इवले
मारू नको ना गर्भात !
असो भ्रूण कोणतेही
सोडा विचार लोकांचा,
दोन्ही सारखेच बाबा
प्रश्न का पेढा ,बर्फीचा ?
आजी तूही आईच ना ?
मग का खार कन्येचा,
येऊ देत ग जन्माला
वंश वाढे मानवाचा !
भ्रूणहत्या पापच ते
जर मुलगाच हवा ,
कन्या आहे कळताच
निरर्थक तो रूसवा !
सगळ्यांना समजावा
आई,बाबा तुम्ही छान,
नको क्रूर भ्रूणहत्या
कन्या वाढे,व्हा महान !
एक सांगणे मोलाचे
भ्रूणहत्या का करावी ?
सर्वा करून शिक्षित
अशी वेळ हो रोखावी !