Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Comedy

3  

Pandit Warade

Comedy

बबन्याचा व्हॅलेंटाईन

बबन्याचा व्हॅलेंटाईन

1 min
7.2K


शहरात म्हणे पोरं पोरी व्हॅलेंटाईन मनवतात 

वर्षातला एक दिवस सुखाचा बनवतात 


व्हॅलेंटाईनची गोष्ट त्यानं दोस्ताकडून ऐकली

त्याच्या डोक्यामध्ये ती घरच करून बसली 


व्हॅलेंटाईनचं भूत बसलं बबन्याच्या डोईवर 

काही केल्या उतरेना भलताच झाला कहर

 

आपणही साजरा करावा एकदा व्हॅलेंटाईन 

हिम्मत कमी पडली तर घ्यावी थोडी वाईन

 

व्हॅलेंटाईनचा दिवस जवळ येऊ लागला 

येता जाता रस्त्याने पोरी न्याहाळू लागला

 

पाटलाची बबली रस्त्यानं येतांना दिसली 

गोरी गोमटी शेलाटी नार मनामध्ये ठसली 


व्हॅलेंटाईनच्या दिवशी तिला रस्त्यात घेरलं

गुलाबफूल नव्हे आख्खं झाडच पुढं धरलं 


चल म्हणे बबली तिकडे झाडाखाली बसू 

गुलू गुलू बोलू आणि खूप खूप खेळू हासू 


बबलीचा बा मागे होता नाही त्याला दिसला 

उतरली नशा, जेव्हा ठोसा पाठीत बसला

 

पाटलाला पाहून बबन्याचं अवसान गळालं 

व्हॅलेंटाईनचं भूत कसं झटक्यातच पळालं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy