Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Abasaheb Mhaske

Romance

3  

Abasaheb Mhaske

Romance

प्रेम हे न सुटणार कोडं

प्रेम हे न सुटणार कोडं

1 min
448


प्रेम हे प्रेम असतं ...

सुंदर मनभावन असतं

प्रेम नसे फक्त वासना

प्रेम हे तर आपसूक होत


ते तर आतून उमलतं ...

भांडून ते कधी मिळतं ?

प्रेम हे प्रेमानेच मिळतं

पशु - पक्षी , प्राण्यानाही कळतं


प्रेम असते एक नाजूक भावना

प्रेम असते एक उस्फुर्त संवेदना

प्रेम असते चंचल , कलंदर ...

प्रेम असते बेहद्द बिलंदर


प्रेम म्हणजे आकर्षणाचं मोहोळ

प्रेम म्हणजे वेदनेच माहेरघर

सूर मनीचे आपसूक जुळतात

बेमालूमपणे परस्परात विरघळतात


प्रेम असते मोहक , मनभावन

प्रेम असते पतित - पावन

कळत - नकळत खूप काही घडत

सुगंधासारखं ते दरवळत तर कधी

प्रेमभंगाने मन ही हळहळत


कितीही समजावलं तरी कुणी मनाला

नको रे राजा असा गल्लीत तमाशा

चार - चौघात होईल हशा ते मात्र ठाम असत

स्वयंभू राजा आपलंच घोड पुढं दामटवत


तसाही तू ऐकणार नाहीस

तुझंच खरं करण्यात माहीर

नंतर मात्र म्हणू नकोस ...

प्रेम - बीम सब झूट


प्रेम असते तारक नि मारक सुद्धा

प्रेम असते वेडेपणा नि आत्मघात

प्रेम आयुष्यातून उठवते बिनादिक्कत

तर कधी पंखात बळ देते घेण्यास उंच भरारी


यशाचे धनी सर्वच होऊ पाहतात

अपयशाचा वाली नसतो कुणी

प्रेम हे न सुटणार कोडं गड्यानो

भल्या - भल्याना न सुटणार


Rate this content
Log in