ते पुन्हा आठवले ...!
ते पुन्हा आठवले ...!
कोरड्या ठप्प नदीच्या काठी बसता
खेळकर रूप तिचे ते आठवले ||
हीच नदी हाच तिचा तो किनारा
पाण्यातले पाय, स्पर्श ते आठवले ||
वाळूत नावांची ती नक्षीदार कोरणी
तुझे स्मित चांदणे तेही आठवले ||
कविता मन चिंब चिंब करणार्या
भारलेले शब्द ते पुन्हा आठवले ||
जादूचे क्षण ते, दिवसही तसेच ते
मोरपीस मन तळातले, ते आठवले ||
आयुष्य झाले आजचे कोरडे जगणे
अजुनी आठवणी ओल्या, हे आठवले ||
--------------------------------------------------------------------------