Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Abasaheb Mhaske

Tragedy Romance

2  

Abasaheb Mhaske

Tragedy Romance

रोखून मज तू पाहू नको

रोखून मज तू पाहू नको

1 min
1.3K


ऐक सखे ! रोखून मज तू पाहू नको 

स्वप्न उगाच तू दावू नको ...

पाहता तू भेदक नजरेनं 

मी खरंच भांबावून जातो ग ...

वेडावत मजला तुझं वागणं ...

देहभान हरपून एकटक पाहाणं

खटकतं ग सगळ्यांना हे सारं... 

चार चौघात अडवून हटकुन बोलणं 

तुझं राज महालातील ऐश्वर्यसंपन्न जगणं 

माझं टीचभर पोटासाठी वणवण भटकणं 

तू स्वनाळू प्रेमवेडी ग ...खरंच सांगतो 

खोटे - खोटे स्वप्न उगाच तू दावू नकोस .. 

प्रेम करणं सोपं असत ग 

निभावणं मात्र केवळ अशक्य 

गरिबी तुला माहीतच नाही अन 

आवश्यक मला स्वबळावर उभं राहणं 

भेटेन तुला ग मनासारखा राजबिंडा 

वेठीस मला तू धरू नकोस ...

नाहीच जाणे त्या गावाला 

रस्ता उगाच तू दावू नकोस  

सहज म्हणालीस... भाव फुकटचा तू खाऊ नकोस

अन कधीही सोडून मला तू जाऊ नकोस ...

सांगितलं ना एकदा उगाच डोक्यात तू जाऊ नकोस

अशक्य दान तू मागू नकोस , स्वप्न फुकाचे दावू नकोस 


Rate this content
Log in