Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

मातीचा गर्व

मातीचा गर्व

1 min
14.4K

बरा होता माझा

कालचा जुना गाव

तिथे माणसाला

मिळत होता वाव --- ||१ ||

 रोज चार माणसं

 ओसरीवर बसायचे

 काबाड कष्ट करून

 पोट भरून हसायचे---- || २ ||

नसे कुणा भेदभाव

जातीचा न पातीचा

गुण्या गोविंदानं नांदे

होता गर्व मातीचा ----- || ३ ||

 महादेवाच्या देवळात

भजन म्हणत बसायचे

 ना बी.पी ना शुगर

 सारे तंदुरुस्त दिसायचे ------ || ४ ||

कबड्डी आणि कुस्ती

रोज नविन खेळ असायचे

होत्या आट्या अन् पाट्या

तेव्हा बॅट बॉल नसायचे ------- || ५ ||

 आमच्या काळात पुर्वी

 माणूसकी होती माणसाला

 चार पाहूने आले की

 सतरंजी असे बसायला ------ || ६ ||

गोठ्यात म्हशी अन्

दारात गायी असायच्या

दूध दुभतं घरात दारी

चार मांजरी दिसायच्या ----- || ७ ||

Rate this content
Log in