Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Others

2.7  

Vijay Sanap

Others

बाप पिता

बाप पिता

1 min
6.7K


बाप महा वाट पाहे

पाहे लेकरु येण्याची

सण येतो बैल पोळा

पोळा आवड बाळाची ||१||


बाप रानामधी जाय

जाय सर्जा राजा संगे

पोळा म्हणे आज बाप

बाप रंगवीतो शिंगे ||२||


धुतो बैल तलावात

तलावात खोल पाणी

गळा बांधे घाटीमाळ

घाटीमाळ धून कानी ||३||


बाप शेतावर राबे

राबे माय संगतीला

तिचे भेगाळले पाय

पाय चालते पाथीला ||४||


बाप तिफणीच्या मागे

मागे चाले बंधू माझा

येता पावसाच्या सरी

सरी येता खुश राजा ||५||


काळ्या माती बाप पेरे

पेरे काळजाचे धनं

धनं येई तरारुन

तरारुन जाई मनं ||६||


बाप पाहे वाट त्याची

त्याच्या जमिनीला भेगा

जाई शेताकडे बाप

बाप रात्र रात्र जागा ||७||



Rate this content
Log in