Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

देवा तुला मी पाहीले

देवा तुला मी पाहीले

1 min
20.3K


आकाशात, समुद्रात

पौर्णिमेच्या रुपेरी चंद्रात...

भक्तीमय पानाफुलांत..

सुगंधी केवड्याच्या नि सुवर्णी

केतकीच्या रानात...

देवा तुला मी शोधीले

भक्तीमार्गाच्या बंधनात

चांदनीच्या संथ सड्यात

मृगजळाच्या आर्त तळ्यात

शोधीले मग साहित्यात

कल्पनेच्या अर्थाअर्थात

स्वप्नातल्या फुलाफूलात

देवा तुला मी शोधीले

श्रावyणाच्या धुंद गाण्यात

नंदनवनीच्या अंगणात

अश्रुपुर्ण आनंदात

ज्ञान सागराच्या कणाकणात

एक तत्व गवसले मग

अंतःकरणात ,विश्वासात....

मनोमनीच्या सार्थक प्रेमात ..

देवा तुला मी पाहीले

प्रीतीच्या निर्मळ अध्यायात

देवा तुला मी पाहीले

प्रीतीच्या निर्मळ अध्यायात..!!!!


Rate this content
Log in