मुखवटा
मुखवटा
1 min
6.6K
मनातले सारे I लपवतो आसू ॥
लपवतो हासू । मुखवटा ॥ १॥
बोलायचे काही | मनात ते एक ॥
मुखात ते एक I मुखवटा ॥ २॥
नजरेत भरे | दिसायचे रुप ॥
दाखवते रूप I मुखवटा ॥ ३॥
चेहऱ्याचे भाव | सांगतात एक ॥
दडवती एक | मुखवटा ॥ ४॥
मागण्यास जाता I भांडे लपवती ॥
बाता बनवती । मुखवटा ॥ ५ ॥