Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
त्याच्या आठवणी...
त्याच्या आठवणी...
★★★★★

© Anuja Sarangale

Romance

1 Minutes   33    0


Content Ranking

कल्पित विचारांचा धनी तो होता.

डोळ्यांचा अभिप्राय तो होता.

हसू बनून चेहरा फुलवणारा तो होता.

तर अश्रु बनून दुःखाचा कडेलोट करणाराही तो होता.

निराशेच्या सागराचा किनारा तो होता.

आशेचा पहिला किरणही तो होता.

आर्त हृदयाचा आक्रोशही तो होता.

व्यथित मनाच्या विसाव्याचं ठिकाणही तो होता.

मित्र बनून सुवर्ण क्षणांचा सोबती तो होता.

तर संघर्षकाळात उदासी काळाचा साक्षही तो होता.

पुढे पाहिले तर हात देणाराही तो होता.

आणि मागे वळून पाहिले तर खंबीरपणे उभाही तो होता.

श्वेत फुलाचा सुगंधही तो बनला.

तर गुलाबाला जपणाऱ्या काट्याप्रमाणे रक्षकही तो बनला.

तळपत्या उन्हात वृक्षाची शितल छाया तो बनला.

रात्रीच्या अंधःकारात ज्योत्स्नाही तो बनला.

मिठीत त्याच्या आश्रयाचं स्थान निर्माण झालं.

तर विचारांमध्ये त्याच्या नवस्वप्नांच फूल उमलू लागलं.

उमलत्या फुलाला सोबत घेऊन जाताना काळ कधी गेला समजलच नाही.

मागे वळून पाहिले तर मात्र तो कुठे दिसलाच नाही.

अनुजा

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..