मुलीची व्यथा
मुलीची व्यथा
आई मला मारण्याचीग गं
का तुलाच झाली घाई
कुणीतरी समजावाना बाई मी
दुनया पाहिलीच नाही ------ ||
काल रातीला सपनामंधी
पाहीला एक फास
दोघे होते आवळत त्याला
माय आणि बाप
मी विचार करूनी थकले
पण काय असे मी चुकले
माझं मलाच उमजत नाही ---- ||
झाले का गं डोईजड मी
तुला हृदयात
नुकतच कस फुल उमलल
कोवळ्या कळीत
काय कोठे मी चुकले
फुल वेलीचे का सुकले
माझं मलाच कळलं नाही ----- ||
वेलीला फुलाचा कधी
होतो का गं त्रास
जंगलानी झाडाचा का
केला वनवास
नाही जंगल कधी सुकले
कसे फळे वृक्षाला पिकले
हे त्यालाच कळले नाही ------- ||