Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dinesh Kamble

Others

4  

Dinesh Kamble

Others

अल्लड बालप्रेम...

अल्लड बालप्रेम...

1 min
12.2K


खूप अल्लड असतं ते बालपणीचं प्रेम

ती एकमेकांची असणारी ओढ

अन् लहानपणाचं ते निस्सीम प्रेम ..

मनात येईल तेंव्हा भेटायचं,

मनमोकळं बोलायचं.

सोबतंच हसायचे ,

सोबतं खेळायचं ,

बागडायचं .


कधी कधी कड़कडूनं भांडायचं सुद्दा .

अन् पुढच्याचं क्षणाला

सर्व विसरूनं जातात ती बालमने.

त्या लहानपणीच्या नात्यांत

एक विलक्षण अनुभूती असते .

एक अविट गोडी असते त्या स्नेहबंधातं .


आणि विशेष म्हणजे कुण्या

मोठ्याव्यक्तीला त्यांत

नाक खुपसायाला

अजिबात वाव नसतो.


ना कोणाची रोकटोक चालते तेथे

आणि केलीचं तरीही कोण

जुमानतं त्या बंधनाला..?

मनमुरादपणे जगायचं असतं

ते अल्लड बालपणीचं प्रेम..


Rate this content
Log in