अवयव दान
अवयव दान
मी मेल्यावर करा
माझे अवयव दान
जेणे कुण्या व्यक्तीला
मिळेल जीवन दान---- || १ ||
मी मेल्यावर दया
अंधाना माझे डोळे
हे जग नाही पाहिले
असे असतील अंधळे ------ || २ ||
लिव्हर करा अर्पण
आहे ज्यांना व्यसन
गरीब शेतकरी माझा
नाही त्याला पेंशन ------ || ३ ||
किडनी माझी ध्यावी
त्या माझ्या आईला
काबाड कष्ट करून
जन्म देईन माझ्या ताईला ----- || ४ ||
आत्मा हा मालक आहे
करु नका कुठे दान
ज्याने दिला मला जन्म
त्या देवाला हा मान ------ || ५||