माझी नोकरी "
माझी नोकरी "
माझी नोकरी नोकरी , आहे चोवीस तासांची
काय करते दिवसभर , मी आहे एक गृहिणी
माझा परिवार हसरे गोकुळ , अंधारी पेटती मशाल
देते संस्कारांचं दान ,मी तिथली सौभाग्यकांक्षिणी //१//
लक्ष संधी होत्या उभ्या , माझ्या या दारापुढे
पण रोजच मला आला , आडवा गं उंबरा
जुन्या चालीरीती अन प्रथांनी, घाट होता घातला
निराशेचा गुंडाळून गाशा , हलका फुलका ठेवला उंबरा //२//
कधी सांडले ते दुध ,
कधी करपली भाजी
कधी अडकला पाय
कधी दुरावली नाती //३//
मशागत करता थोडी
फुले हास्याची लागली
मोद भरला जीवनी
बाग सुसंस्कारे बहरली //४//
अस्सा फुलला संसार
त्याले चाफ्याचा परिमळ
माझी बाग हिरवीगार
माळी देवा तू सांभाळ //५//