गठबंधन
गठबंधन
फक्त गठबंधन नाही,
हे नात्याचे।
हे तर मिलन,
अपुल्या ह्मदयाचे।
विश्वासाने सखया
हात हाती देते,
विनवणी एकच करते
टिकावे अपुले नाते।
दुरावा स्वप्नीही
मज सोसणार नाही
सारे काही मागे टाकून
परघरी आले तुजपाई।
दे वचन आज एक।
पाठीशी माझ्या तू रहा धिरगंभीर,
परिस्थितीला मी घाबरणार नाही
मग असू दे संघर्ष कसाही।
सहजिवनाच्या या वाटेवर।
साथ अपुली अशी अनुपम।
जशी शिंपल्यात मोती
आणि जळे दिव्यात ज्योती।