Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
देवदासी
देवदासी
★★★★★

© Latika Choudhary

Tragedy

1 Minutes   21.4K    18


Content Ranking

 वेदिका,

तूच सांगू शकतेस बाईपणाचा 

सोस आणि भोग देवदासी रुपातला...!

तुझ्याजवळ धारिष्ट्य तुला फक्त

मादी समजणाऱ्या पुरुषी

गिधाडी मानसिकता सांगण्याची....!

विचित्र संस्कृती,रितीरिवाज,

बुरसटलेली बालिश बुद्धी,

परंपरेला नग्न करण्याची....!

अगं वेडे, तुला काय वाटते,

फक्त देवदासीच याच्या बळी आहेत?

नाही गं वेडे, ह्या भोगवादी 

विश्वपसाऱ्यात दिखाव्याचे सूर्य

खुप आहेत ....

मुखवटयांच्या जत्रेत 'यूज अँड थ्रो ' ची

तकलादू मनोवृत्ती---- 

'उच्चवर्णीय...सामान्य...गृहिणी...

परित्यक्त्या...बुद्धिवादी...कामगार...

नवऱ्यावाली...वेश्या...किंवा

आकाशाला गवसणी घालणारी सबला,

सक्षम स्त्री असा काही फरक न करता " मादी " च्याच

तराजूत तोलते अन संधी मिळताच

लचके तोडू पाहते....!

पण चरबी ..चामडी...शिल ओरबाडून तूझे सर्वस्व हडप करून,

 'तू तुझी काहीच उरत नाही....'

असे त्यास वाटत असले तरी ,

 नाही चोरू शकत मन तुझे....आणि 

ही त्याची हार आहे....!

तू उरते फक्त 'वेदना' म्हणून...

तुझी....त्याची...स्त्रीत्वाची...!

तू दावू शकते वेदना...जखम

पण ..........

आम्ही सुखी भासणाऱ्या बायकाही

'मादी' तर आहोत...

भोळेपणाने मनही अर्पण केले ...

उरले नाही काहीच 'आमचं' म्हणून.....!

आम्हाला नाही परवानगी

जखमा उघडे करण्याची...कारण.... ...

भिती आहे-- 'पिता -पुत्र -पती '

रुपातला 'पुरुष' बदनाम होण्याची.....!

स्त्रीचे मन सर्वच स्त्रिया गिधाडे अपमान अवहेलना शरीर

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..