मोग-याच्या कळ्या
मोग-याच्या कळ्या
1 min
898
मोग-याच्या कळ्या
आम्ही कळ्या कळ्या
मोग-याच्या कळ्या
रखरखत्या उन्हात
दिवसभर झाडावर
आम्ही कळ्या कळ्या
मोग-याच्या कळ्या
आम्ही नाजुक नाजुक
दोन दिवसाचे जगणे
फुलतो आम्ही अलगद
तुम्हाला सुगंध देणे
आम्हाला ओढ आभाळाची
गरजणा-या घन ढगांची
गीत आनंदाचे गातो
आम्ही पानाआड खेळतो
आम्ही कळ्या कळ्या
पांढ-या साध्या भोळ्या
आमची वा-याशी सोबत
पावसाची गाढ मैत्री
सावलीची आमची नाती
आमचे क्षणभर जगणे
जगाला सुगंध देणे
हेच देवाचे देणे
आम्ही कळ्या कळ्या
मोग-याच्या कळ्या