प्रेम एक भाषा
प्रेम एक भाषा
1 min
468
प्रेम एक आकर्षण
दोन मनांचं मिलन
निःस्वार्थ, निःसंकोच
देवाघरचं देणं
प्रेम एक भास
कळत नकळत होत
सर्वांसाठी खास
आपुलकीचा घास
प्रेम एक आशा
मिळता आभाळ ठेंगणं
पदरी येता निराशा
असह्य होत जगणं
प्रेम एक वासना
अतिरेकी संवेदना
राग, द्वेष, लोभ, मोह
मत्सर यांचे माहेरघर
प्रेम एक शिकवण
दया, क्षमा, शांती
प्रज्ञा, शील, करूणा,
तेजस्विता, तपस्विता, तत्परता
प्रेम एक भाषा
अनाकलनीय, अवीट
पशु - पक्षी, चराचर सृष्टी
व्यापून टाकणारी