कविता कागदावरची
कविता कागदावरची
1 min
218
कविता कागदावरची
ठाव घेते मनाचा
आत्म्यातील शाई
भाव सांडते ह्रदयाचा...
अलवार जरी येतात
कंठ दाटूनच फुटतात
कागदावरील शब्द
मुक्तपणे ही बोलतात ...
आत्म्यात वसलेले
को-या कागदावर उमटतात
रंग नसूनही ती शाई
रंगीत करून अजरामर ठरतात ...
इतिहासात जाण्याची
क्षमता नसून ही ...
काळ त्यांना न्यायही देतो
पिढ्यानपिढ्या काळजात जिवंत ठेवतो