Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SANJAY SALVI

Others

3  

SANJAY SALVI

Others

माझं झाड ...

माझं झाड ...

1 min
349


एक रोप मी आणलं - त्याला अंगणी लावलं,

थोडं पाणी त्याला दिलं - जरा खत बी दावलं,

         ते असं तरारलं - सरसर वर गेलं,

         रोपाचं झाड झालं -  अंगणात  पसरलं,

त्यानं दिलं फुल फळ - त्यानं सरपण दिलं,

लता वेलीनाही त्यानं - फांदीवर चढू दिलं,

         चिमणी राघू मेंना आलं - त्यांनी घरट बांधल,

         सार झाड चिवचिवल - आणि पुन्हा बहरलं,

दोन वाटसरू आलं - झाडाखाली विसावल,

चटणी भाकर खावून - दोन घटका बसलं,

        सारे मेयतर जमल - त्यांचा झाडाखाली खेळ,

        माझ्या साठी कधी काळ - त्यानं मला जोजवल,

असं सर्वांसाठी त्यानं - आहे काहीतरी केलं,

पण त्यानं माझ्याकड - काही नाही मागितलं,

        आता झाड आहे माझं - बरंच थकलेल,

        उभा जन्म आहे त्याने - ऊन पाउस भोगलं,

 



Rate this content
Log in