ठसा ( काव्यांजली )
ठसा ( काव्यांजली )
1 min
6.9K
शाळेच्या बाहेर
बसून उघडया व्हरंड्यात
ठसा शिक्षणात
भीमाचा ॥१॥
ठसा मनावर
पुस्तकांना मानलं गुरु
वाचन सुरु
अखंडीत ॥२॥
ठसा संविधानात
दिसे फक्त बाबासाहेबांचा
निर्माता राष्ट्राचा
लोकशाहीत ॥३॥
बुध्द धम्माचा
ठसा असे जगावर
दिक्षाभूमी नागपूर
स्विकारला ॥४॥
महापरिनिर्वाण तरी
ठसा पिढ्या पिढयावर
लोंढा चैत्यभूमीवर
लेकरांचा ॥५॥