पर्यावरण गीत
पर्यावरण गीत
1 min
21.7K
झाडं लावूया रं गड्या
झाडं लावूया
पर्यावरण रक्षिण्या झाडं लावूया ।।धृ।।
फळांची वा काटेरी
छोटी छान रोपटी
मोठे वृक्ष असो
वा झुडुपे खुरटी
लागवड त्यांची करुया रं गड्या झाडं लावूया।।1।।
दुतर्फा रस्त्याच्या
ओसाड माळरान
गावाची टेकडी
वा मोकळे मैदान
खड्डे आपण खोदूया रं गड्या झाडं लावूया।।2।।
लावूनिया रोपटे
पाणी त्याला घालू
करूनिया कुंपण
निगा त्याची राखू
संगोपन त्याचे करुया रं गड्या झाडं लावूया।।3।।
वृक्ष लागवडीने
वाढेल हे जंगल
पावसाच्या पाण्याने
होईल हो मंगल
रुष्ट धरेला हसवूया रं गड्या झाडं लावूया।।4।।