कशाला छळावे...? (गझल)
कशाला छळावे...? (गझल)
1 min
466
तिचे वासरू का दुधाला छळावे ?
उगा दावणीला कशाला छळावे...
मुका जीव माये बिचारा झुरावा...
कशाला तिच्या पाडसाला छळावे ?
डफावर पडावी जरा थाप त्याची
कशाला तिच्या घुंगराला छळावे ?
तुझा देव वारीत पायी हिंडला
कशाला उगा मंदिराला छळावे ?
उधानास कोठे तमा राहते का?
कशाला किनारी...डोहाला छळावे ?
दिसे गाल-ओठी खळीची निशाणी
कशाला गुलाबी मुखाला छळावे ?
मनाचा दुरावा तुला का कळेना
कशाला सखे तू उराला छळावे ?