स्त्री एक प्रेरणा...!
स्त्री एक प्रेरणा...!
स्त्री एक प्रेरणा म्हणता
सारे काही आठवते अन जाणवते
पुराणातली वांगी पुराणात म्हणता
बराच काही इतिहास आपल्याला ती शिकविते
स्त्री जीवनाचा लेखा जोखा
इतिहासातच आपल्याला सापडतो
रामायणाची मुहूर्त मेढ सीतेनेच कि हो रोवली
तरीही चारित्र्य सम्पन्नतेची प्रेरणा आपण घेतली
महाभारताची पेरणी देखील तशीच कि हो झाली
द्रौपदीच्या अपमानाने भाऊबंदकी सहजी पेटली
अनेकविध रूपे आपण आजवरी पहिली
खरी सबला अबला म्हणून नावा रुपास तीआली
सर्व थरातून संचार स्त्रीचा हा
अखंड अविरत सदैव चालूच आहे
तरीही आजही ती अबला
म्हणूनच ओळखली जात आहे
प्रत्येक क्षेत्राची मालकीण असूनही
ती स्वतःचे सारेच प्रदान करतेच आहें
त्यागाची परिसीमा ओलांडूनही
स्वार्थाचा मळवट नशिबाने भाळी भरते आहे
जगत जननी ती विश्वाची खरोखर
जीवन सुंदर आपल्याला देते
अंगा खांद्यावर खेळवून
मोठे आपल्याला ती लीलया करते
आज प्रेरणेचा खरा स्रोत म्हणुनी
सबला म्हणून सन्मान तिचा होऊ दे
निस्वार्थ भावनेने तिचे स्थान तिला लाभू दे
घरची लक्ष्मी ती ,घराचे वैभव तिला वाढवू दे
घरच्या धन्याला तिच्या सवे
उदंड सौभाग्य लाभू दे
सदैव घरो घरी अन त्रिकाल त्रिलोकी
सौख्य समाधान शांतीचे जीवन तिला मिळू दे...!