घे प्रेमाचे नाते जोडून
घे प्रेमाचे नाते जोडून
मृत्यूसमय जवळी येता
माणूस म्हणतो नको नको
तेव्हा जवळी नसते कोणी
ना पोरे ना बायको
कमावलेली सारी पुंजी
येथेच राहते पृथ्वीवरी
केली असतील जर सत्कर्मे
तीच देतील साथ खरी
घास मुखी घाला गरिबाच्या
मुक्या जीवासही द्यावे प्रेम
मदतीचा हात गरजूस द्यावा
दीन दुबळ्यांचे घ्यावे क्षेम
तुटक्या बुंध्यापाशी शेवटी तुझा
यमदूत नेती ओवून
तेथेही तू गोड बोलूनी
घे प्रेमाचे नाते जोडून