या वीर जवानांसाठी!
या वीर जवानांसाठी!
1 min
1.2K
डोळ्यात धाक अंधाराचा,
अंगावर मात शहाऱ्यांची
लढा हा मातृभूमीसाठी
देह करेन अर्पण
या वीर जवानांसाठी!
मनात आग राष्ट्राची,
भिऊन जात परराष्ट्राची
ताठ मान देशासाठी
देह करेन अर्पण
या वीर जवानांसाठी!
भीती नाही मरण्याची,
आशा नको जगण्याची
वंदन त्या शौर्यासाठी
देह करेन अर्पण
या वीर जवानांसाठी!
स्वप्न मनी हुतात्म्यांची
धैर्य जागी स्वातंत्र्याची
सलाम या तिरंग्यासाठी
देह करेन अर्पण
या वीर जवानांनसाठी!