Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shashikant Shandile

Others

2  

Shashikant Shandile

Others

==* आई *==

==* आई *==

1 min
6.5K


आई तू कुठे आहे मला दिसत का नाही

झाल्या चुकांसाठी मला रागावत का नाही,

आई तू कुठे आहे मला दिसत का नाही? 

रात्री उशिरा पशिरा जेव्हा घरी गं मी येतो

कान धरून माझे मला मारत का नाही

मी बिघडलो कि काय काळजी नाही का गं तुला

काय करतो काय नाही चौकशी कर जरा

 वाटतं कधी कधी चुलीवर भाकर करीत आहे

बघतो त्या अंगणात चुलच राहीली नाही

शाळेतून येतांना माझी वाट तू पहायची

मला बघून प्रेमाची मिठी तू मारायची

 मारायची तू मला, तू माझे लाडही करायची,

माझी गं तू किती काळजी करायची

आई जग असून सारे, कमी तुझी गं भासते

तुझ्या विना लहानपण व्यर्थ आज ते वाटते

 देवाला विनवले मी अन् प्रार्थनाही केली

तुझ्यासारखी माया ना आजही गवसली

तुझी माया तुझा प्रेम शोधू तरी कुठे?

तुझ्या प्रेमाचे मोल आई फेडू तरी कसे?

 


Rate this content
Log in