नको जाळूस देह आपुला
नको जाळूस देह आपुला
1 min
354
नाही केली पर्वा हाताची
तुझ्या जीवासाठी
का उतावीळ एवढी तू
मृत्यूस कवटाळण्यासाठी
माझ्या व्यसनापायी
नकोस त्यागु प्राण
वागेन आता मी चांगला
लेकरांची आण
कमावेन मी पैसा ग नको
जाळूस जिव आपुला
सोडेन मी ही दारु ग
नको जाळूस देह आपुला