रानातले गाणे
रानातले गाणे
रानातल्या लाल वाटा,
लाल वाटा जाती दूर,
दूर दूर डोंगरात,
रानातली मोठी झाडे,
मोठी झाडे जाती उंच,
उंच उंच आकाशात,
रानातली खोल दरी,
खोल दरी जाते खाली,
खाली खाली पाताळात,
रानातली निळी नदी,
निळी नदी वाहे लांब,
लांब लांब समिंदरात,
रानातला रान मेवा,
रान मेवा लागे गोड,
गोड गोड मधपोळ.